१९८७ पासून हजारो लोकांचा विश्वास असलेली पतपेढी
दत्तसेवा सहकारी पतपेढी ची स्थापना सन 1987 मध्ये झाली. संस्था सुरू करणे ही मोठी गोष्ट नसून ती कार्यरत ठेवणे अवघड आहे. असंख्य अडचणींवर मात करून उंच उभी राहणारी संस्था यशस्वी मानली जाते. दत्तसेवा संस्थेचीही तीच स्थिती आहे. पहिली दोन वर्षे आनंद माईंगडे (दादा) यांच्या घरी संस्थेचे कार्य चालू होते. त्यानंतर मालवणी येथे कार्यालय घेऊन कार्यालय सुरू केले.आज या संस्थेला 37 वर्षे पूर्ण झाली असून मालवणी, गोरेगाव, गोराई, जोगेश्वरी (प), कांदिवली, जोगेश्वरी (पूर्व), मालाड (पूर्व), नाहूर, नायगाव, शेडगेवाडी, म्हाडा मालवणी, दहिसर, भांडुप, नालासोपारा, तुरूकवाडी, घाटकोपर, अंधेरी, विरार, मलकापूर, भिवंडी व दादर (पूर्व) येथे संस्थेच्या एकूण 21 शाखा आहेत.सर्व शाखा संगणकीकृत आहेत, आणि सर्व शाखा इंटरनेटद्वारे जोडल्या गेल्या आहेत. संस्थेचे खेळते भांडवल 365 कोटी असून सभासद संख्या 83135 आहे. दत्तसेवा सहकारी पतसंस्थेत 101 कर्मचारी आणि 106 दैनंदिन प्रतिनिधी आहेत.

21 शाखा
83135 सभासद
५१२ कोटी संमिश्र व्यवसाय
२६१ कोटी ठेवी
२५० कर्ज
“इतरांची सेवा करून देवाची सेवा करणे” या ब्रिदवाक्यावर दत्तसेवा पतपेढी विश्वास ठेवते
यशाच्या किल्ल्या
- ग्राहकांशी असलेले नातेसंबंध (ग्राहक आणि संभाव्य ग्राहक या दोघांशीही एकनिष्ठ, आदरणीय आणि सखोल संपर्क विकसित करणे).
- विपणन / रणनीती आणि इतर व्यावसायिकांसह नेटवर्किंग.
- ग्राहकांना प्रतिसाद देणे (विशेष समस्यांसाठी जलद प्रतिसाद )
- गुणवत्ता (विशेषत:माहितीचा अहवाल देताना).
- वचनपूर्तीत उत्कृष्टता .खुलेपणा : आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संपर्क निर्माण करण्यासाठी भाषा आणि इच्छाशक्ती.
दृष्टी
आपल्या सभासदांना सर्वोत्कृष्ट सुविधा देण्याची आणि ग्राहकांना योग्य सहकार्य करून सभासदांचे पूर्ण समाधान देऊन जास्तीत जास्त सभासदांची सेवा करणे हि दृष्टी आहे.
मिशन
सभासदांना योग्य मार्गदर्शन व सेवा देणे तसेच सभासदांना प्रामाणिक आणि सौम्य सेवा देऊन त्यांची आर्थिक ताकद वाढवणे.

श्री. आनंद माईंगडे (दादा)
सन 1987 साली दत्तसेवा सहकारी पतपेढीची स्थापना करण्यात आली. प्रथम दोन वर्षे श्री. आनंद माईंगडे (दादा) यांच्या राहत्या घरात संस्थेचे काम चालु ठेवले. त्यानंतर मालवणी येथे जागा घेऊन कार्यालय सुरु केले. आज संस्थेच्या मालवणी,गोरेगाव,गोराई,जोगेश्वरी (प),कांदिवली,जोगेश्वरी (पूर्व),मालाड (पूर्व),नाहूर,नायगाव,शेडगेवाडी,म्हाडा मालवणी,दहिसर,भांडुप,नालासोपारा,तुरूकवाडी,घाटकोपर,अंधेरी,विरार,मलकापूर,भिवंडी व दादर (पूर्व) येथे संस्थेच्या एकूण 21 शाखा कार्यरत आहेत. सर्व शाखा संगणीकृत असून सर्व शाखा इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत. संस्थेचा संमिश्र व्यवसाय 512 कोटी व सभासद संख्या 83135 आहे. दत्तसेवा सहकारी पतपेढीचे 101 कर्मचारी व 106 दैनंदिन प्रतिनिधी आहेत.
आपल्या कर्तृत्वाने राज्य, देश पातळीवर चमकणारे, नावलौलिक मिळवणारे भरपुर आहेत. परंतु ते देखील आपल्या गावाकडील व्यक्ती, आपल्या बालपणाचा काळ, त्यावेळची परिस्थिती याचा विचार करित नाहीत. काही वेळा स्वार्थ बाजुला ठेवुन परमार्थ, समाजसेवा देखील करावी लागते वरील सर्व बाबीचा विचार करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मानवाने आपल्या काही गुणात्मक कलेने आपले जीवन परिपुर्ण केलेले असते. परंतु त्यासाठी आवश्यक असते ती जिद्द, चिकाटी व श्रम करण्याची कुवत.आपला गाव, आपल्या गावातील विकास सोडुन काही तज्ञ शिक्षित लोक हे शहरामध्ये स्थायिक होतात. ग्रामीणतेचा विचार करत नाहीत. परंतु माझ्या मते एक व्यक्ती यास अपवाद आहे ती म्हणजे मा. श्री. आंनद ईश्वर माईगडे (दादा) जन्म दि. 01/06/1958 एका छोटया कुंटुंबात जन्माला येऊन विशाल असे कार्य आज यांनी साकाराले आहे ते केवळ ग्रामीण भागाची जाण असल्यामुळे व गावच्या विकासाच्या तळमळीनेच.आपले प्राथमिक शिक्षण पुर्ण झाले नंतर ते सर्व प्रथम मुंबईमध्ये आले. नंतर मिल मध्ये काम करत रात्र शाळेत 12 वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर हळुह्ळु दत्तसेवा मंडळाची स्थापना केली व प्रारंभी गावकडील मंदिराचा जिर्णोध्दार केला व समाजसेवेचा वसा हाती घेतला पुढे शासकीय सेवेमध्ये रुजु झाले. तरीही तेथे ते थांबले नाहीत. माझ्या गावामध्ये असणारा रोजगाराचा प्रश्न त्यांनी जाणला. व दत्तसेवा पतपेढेची स्थापना केली. आज या संस्थेच्या 21 शाखा कार्यरत आहेत. व एकुण 207 कर्मचारी रोजगार मिळवत आहेत. संस्था असुन देखील त्यांना शहरामध्ये शिक्षणाच्या सोई भरपुर आहेत. त्यामुळे इथला विदयार्थी प्रत्येक स्तरावर काम करताना दिसतो. प्रसंगी या सर्व सोयीची ग्रामीण भागामध्ये कमतरता दिसते.या करिता त्यांनी अतिशय खंबीरपणे आपल्या जन्मभुमीमध्ये दत्तसेवा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली व सध्या 1000 विदयार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. नुसतेच शिक्षण घेत नाहीत तर स्पर्धेच्या युगातील सर्व शैक्षणिक सोयी या संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांच्या कर्तॄत्वामुळे गावाचे नाव आज राज्यपातळीवर यशस्वी गाव म्हणुन ओळखले जाते. ग्रामीण भागात त्यांनी वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, वाचनालय, मोफ़त वह्या वाटप इ. कार्यक्रम यशस्वी केले आहेत. यामुळे त्यांना साथ संगत मानपत्र, राष्ट्रीय निर्माण रत्न, शिक्षण रत्न, सहकार भुषण, भास्कर २००७ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.
अशा या थोर पुरुषाच्या भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा व समाज कार्यास मानाचा मुजरा !