बचत ठेव
दररोज व्यवहार करणाऱ्या सभासदांच्या सोयीकरीता कमीत कमी रु.१००/- भरून खाते सुरु करता येते. सदर खात्यावर प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपासून महिना अखेर खात्यात कमीत कमी जी शिल्लक रक्कम असेल त्या शिल्लक रक्कमेवर द.सा.द.शे ४% प्रमाणे दरवर्षी माहे सप्टेंबर व मार्चमध्ये खात्यावर व्याज जमा करण्यात येईल. खातेदारास आठवड्यातून दोन वेळा पैसे काढता येतील. मात्र खात्यावर कमीत कमी रु.२००/- शिल्लक असावी लागेल. प्रत्येक सभासदाने जवळच्या शाखेमध्ये जाऊन बचत खाते जरूर चालु करावे. जेणेकरून त्यांची लाभांश रक्कम त्यांचे बचत खाती वर्ग करण्यात येतील.